चिनावल परिसरात देशी दारूची अवैध सर्रास होलसेल विक्री
चिनावल,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील चिनावल येथील दारू दुकानातून चिनावल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध होलसेल विक्री होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असूनही मुद्दामहून डोळेझाक करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
चिनावल परिसरातील चिनावल सह कुंभारखेडा, मोठे वाघोदा,वडगाव,विवरा,उटखेडा,गौरखेडा,लोहारा,सावदा, कोचुर,रोझोदा, खिरोदा, सावखेडा खु,बु, कळमोदा आदी परिसरातील गावांमध्ये ढाबे ,हॉटेल,गावात अवैध विक्री करणारे आशा लोकांना, चिनावल येथील देशी दारू दुकानातून अवैधरित्या देशी दारू होलसेल विकण्याची परवानगी नसताना होलसेल दारु पोहच अवैध विक्री केली जाते,या बाबत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना काहीही माहिती नाही काय? अनभिग्न आहेत काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या काळातही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांनाही येथे अवैध रित्या दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री केली गेली , असे अवैध पणे दारू विक्री करणे म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादा शिवाय शक्य आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून चिनावल येथून होणाऱ्या दररोज लाखो रुपयांच्या अवैध देशी दारू होलसेल विक्री बंद होणार का? तूर्त एव्हढेच…!