इंपॅक्ट ; खिर्डी येथे गटारींची साफ सफाई करण्यास सुरवात
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। खिर्डी खु येथील नवीन गावठाण परिसरातील गटारी मध्ये मोठ्या प्रमाणावर काडी कचरा प्लॅस्टिक पिशव्या माती मुळे सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्यामुळे सांडपाणी तुंबले होते त्यामुळे गटार ओव्हरफ्लो होवून सांडपाणी नागरिकांच्या घराजवळ जमा होवून त्या ठिकाणी डबके तयार होत असल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीव जंतू व डासांची वाढ होण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
या बाबत दि.२२ मे रोजी खिर्डी येथे साफसफाई अभावी गटारिंची दयनीय अवस्था नागरिकांचे आरोग्य धोक्यात या मथळ्याखाली मंडे टू मंडे न्यूज ने वृत्त प्रसारित केले होते.या वृत्ताची दखल खिर्डी खु चे सरपंच राहुल फालक व ग्राम पंचायत सदस्य अल्ताफ बेग रहीम बेग यांनी त्वरित नवीन गावठाण परिसरातील सर्व गटारींची साफसफाई करण्याच्या सूचना सफाई कामगार यांना देण्यात आल्या असून गेल्या दोन दिवसापासून साफसफाई करण्याचे काम जोरात सुरू आहे.