धक्कादायक ; रावेर तालुक्यात ६५ वर्षीय वृद्धाचा ५ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार
रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ रावेर तालुक्यातील ६५ वर्षीय वृद्धाने एका पाच वर्षाच्या बालिकेवर दारूच्या नशेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. १८ फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी वामन बळीराम घाटे (बेलदार) हा रावेर तालुक्यातील गोलवाडे या गावचा रहिवासी असून या बाबत निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
रावेर तालुक्यातील एका गावातील पाच वर्षे वय असलेली बालिका ही तीच्या आजीच्या घरी गेल्या एक महिन्यापासून राहत होती. बालिका रविवारी घरामध्ये एकटी असताना दुपारी ४ वजेच्या सुमारास आरोपीने घरात कोणीही नसल्याचे पाहून दारूच्या नशेत बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली आरोपिनेच दिली आहे. आरोपी वामन बळीराम घाटे (बेलदार) (वय – ६५) रा. गोलवाडे ता. रावेर. याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असून या बाबत अधिक तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सपोनी हरीदास बोचरे हे करीत आहेत.