रावेर तालुक्यातील गहूखेडा शिवारात वीज मोटारींच्या तारांवर डल्ला
तासखेडा, ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज. अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी काठ परिसरातील गहुखेडा शिवारात सहा पाण्याच्या विजेच्या मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली.
रावेर तालुक्यातील तापी काठ परिसर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गहुखेडा शिवारातील सहा पाण्याच्या विजेच्या मोटारी फोडून तांब्यांच्या तारांची चोरी केली, सदर घटना दि. 02-07-2022 शनिवार रोजी रात्री चोरट्यांनी गहुखेडा शिवारातून नदि काठी ठेवलेल्या सदाशीव सोमा चौधरी, युवराज चौधरी, उत्तम , व विजय कोळी,रा. रणगांव यांच्या प्रत्येकी एक मोटर. आणि खुशाल पाटील. गहुखेडा यांच्या दोन अश्या एकूण सहा पाण्याच्या मोटारी फोडून त्यातून तांब्याच्या तारांची चोरी केली . चोरट्यांनी एक नव्हे तर तब्बल सहा मोटारी फोडून नेल्याने अधिच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले, या अधि सुद्धा अश्याच प्रकारे मोटारी चोरीच्या घटना घडल्या असून आता पुन्हा चोरट्यांनी तोंड वर काढले आहे. या अश्या वांरवार घडत असलेला घटनांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यावर कायमचा तोडगा निघायला हवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.