अवघ्या चार तासात सावदा येथील हत्येचा उलगडा,दोन आरोपी गजाआड
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा शहरातील कोचुर रोडवर रविंद्र बेंडाळे याचे शेतात शेत मजुराकरिता बांधलेल्या घरात त्याच्याकडे काम करित असलेला सुभाराम बारेला रा. आंबळी ता. झिरण्या जि. खरगोन मध्यप्रदेश हा राहत होता. आज दि.३०/०३/२०२४ रोजी ०७.३०. वाजेच्या सुमारास सुभाराम बारेला हा सकाळी कामावर आला नाही म्हणून शेत मालकाने सुभाराम याची चौकशी केली असता शेतातील घरात त्याचे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन झाल्याचे आढळुन आले त्यावरुन लोकेश बेंडाळे याचे फिर्यादीवरुन सावदा पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं ६३/२०२४ भा.द.वि क ३०२ प्रमाणे अज्ञात गुन्हेगारा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि जालिंदर पळे व पथकाने धाव घेऊन तेथील परिस्थीची पाहणी करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवुन आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणून काम करणारे सर्व मजुरांची माहीती घेतली त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाचे व राहण्याचे ठीकाणी मिळुन आले नाहीत त्यावरुन त्याची माहीती घेण्यास सुरवात केली असता त्यानी त्याचे मालकाकडुन सकाळीच रोजदारीचे पैस घेऊन गेल्याचे समजल्याने चार वेगवेगळी पथक निर्माण करुन सदरचे संशयित शेत मजुराचे नातेवाईक याचा शोध घेत असताना त्यातील एकाचे नातेवाईक उदळी गावाचे हद्दीत राहत असल्याचे समजले वरुन त्याठीकाणी पोलीस पथक गेले व संशयिताना वेगवेगळ्या ठीकाणावरुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली घटना सांगितली. प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी नामे सुकलाल रतन लोहारे रा.नेपानगर (म.प्र) व अर्जुन मुन्ना आवासे रा. ब-हाणपुर (म.प्र) यानी मृतास झोपेतअसताना डोक्यामध्ये दगड टाकुन त्याचा खुन केल्याचे निष्पन झाले आहे. याबाबत गुन्ह्याचे कारणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात मा.श्री महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री. अशोक नखाते सो, अप्पर पोलीच अधिक्षक जळगाव, मा. श्री राजकुमार शिंदे सो, उप. विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर उप. विभाग मुक्ताईनगर याचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे श्री. जालिंदर पळे सहा. पोलीस निरिक्षक यांनी पोउपनि श्री अमोल गर्ने, सफौ/३६२ संजय देवरे, पोहेकॉ/१६०२ विनोद पाटील, पोहेकॉ/१६१६ यशवंत टहाकळे, पोहेकॉ/१८४२ देवेंद्र पाटील, पोहेको १६९० विनोद तडवी, पोकों/३२४१ प्रकाश जोशी, पोकॉ/५३० किरण पाटील याचे पथक तयार करुन गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नसतानाही वरील प्रमाणे त्वरीत हालचाल व चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत आरोपीस निष्पन केले व त्याना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा कडिल अधिकारी व पो. अंमलदार, अंगुली मुद्रा तंज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांनी तपासकामी मदत केली आहे.