भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी येथे उद्दिष्ट अभावी पात्र लाभार्थ्यांना करावी लागतेय घरकुलाची प्रतीक्षा

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी येथील गोर गरीब लोक अनेक वर्षापासून झोपडी वजा कच्ची घरे बांधून गेल्या ३० ते ३५ वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. तसेच आबाल वृध्द,लहान मुलांचे उन वारा पाऊस यांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना हक्काचे घराची नितांत गरज असूनही अद्याप पर्यंत अनेक कुटुंबे शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित असल्याचे वास्तव चित्र आहे. शासनाची इंदिरा आवास योजना संपुष्टात आली असून त्या जागी प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना राबविण्यात येत असून आजही अनेक कुटुंबांसाठी हक्काचे घरकुल फक्त दिवा स्वप्न ठरत आहे.

सन २०-२१ या वितिय वर्षात खिर्डी येथील ग्राम पंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचा आवास प्लस ॲप च्या माध्यमातून सर्व्हे करून २४१ लोकांचे नावे शासनाकडे मंजुरी करिता पाठविण्यात आली होते.तसेच ऑनलाईन वेब साईट द्वारे प्रधान मंत्री आवास योजनेत पात्र लाभार्थींची ब यादी ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध होवूनही शासनाकडून घरकुल प्रस्तावकामी उद्दिष्ट मागविले जात नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना हक्काच्या घराकरिता प्रतीक्षा करावी लागत असल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.तसेच सध्या हिवाळा त्रुतू सुरू असल्याने कडाक्याची थंडी जाणवत असून गोरगरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर नसल्यामुळे खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.कोण्या गोरगरीब कुटुंबाचा बळी जाण्याची वाट शासन पहात आहे का? तसेच २४१ प्रस्तावापैकी फक्त १७ घरकुलांचे प्रस्ताव मागविण्यात आले असून शासन दरबारी उर्वरित घरकुलांचे प्रस्तावाचे कामकाज मार्गी लागणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!