खिर्डी येथे झाडावरच केळी पिकल्याने शेतकरी चिंताग्रस्त
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। तालुक्यातील खिर्डी खु.येथील रहिवाशी युवराज इंगळे यांची भामलवाडी शिवारात असलेल्या सहा एकर शेती मध्ये त्यांनी गेल्यावर्षी केळी रोपांची लागवड केली आहे.परंतु अस्मानी संकटामुळे आणि करपा रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शिल्लक राहिलेल्या केळी खोड व्यवस्थितपणे संगोपन करून जेमतेम उत्पन्न मिळाले मात्र.काही महिन्यांपासून केळीची मागणी कमी झाल्याने व व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभार पाहता बाजार भावाप्रमाणे केळी कापून देण्यास शेतकरी तयार असूनही व्यापारी केळी खरेदी करण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या खिर्डी परिसरात दिसत आहे.
तसेच ६० ते ७० किं केळी ही झाडावर पिकल्याने केळी गळून पडत असल्याचे दिसत आहे.तसेच केळी रोपांवर केलेला खर्च ही निघत नसल्याने केळी पिकाची लागवड करणे परवडत नसून शेतकऱ्यालाआर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.तसेच डोळ्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने संपूर्ण खर्चाचे बजेट कोलमडले आहे असे युवराज इंगळे यांनी मंडे टू मंडे न्यूज शी बोलताना माहिती दिली
गेल्या वर्षी सहा एकरात केळीची लागवड केली असता त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून केळीला मार्केट मध्ये उठाव नसल्याने मनमानी भावाने व्यापारी केळी खरेदी करीत आहे.तसेच योग्य त्या वेळेत केळी कापली जात नसल्याने झाडावर पिकत असून जणू काही शेतात पिकलेल्या केळीचा सडा टाकला आहे असे वाटत आहे.