भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

खिर्डी येथे रस्त्यातच चिखल युक्त घाण पाणी,रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे ग्रामस्थ त्रस्त

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील बाजार पेठ परिसरातून जाणाऱ्या बलवाडी रस्त्याचे १०० मीटर सिमेंट काँक्रिटीकरणाचे एक साईडचे काम पूर्ण करण्यात आले परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या रस्त्याचे एक साईडचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून अपूर्ण असल्याने एकेरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने समोरील वाहन पास होई पर्यंत वाट पाहावी लागते.

तसेच रस्त्याला ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने त्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.तसेच रस्त्यावर चिखलयुक्त घाण पाण्याचे डबके साचत असल्याने रहिवाश्यांना डासांचा आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा खूप त्रास होत आहे.तसेच संबंधित ठेकेदार यांनी गेल्या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी रॉ मटेरियल आणले परंतु एक साईड ने वाहतुकी साठी खुल्या असलेल्या रस्त्याच्या मधोमध वाळूचा ढीग टाकल्यामुळे वाहतूक खोळंबली असून नागरिकांना चिखल युक्त घाण पाण्यातून येजा करावी लागत आहे.तसेच सदर ठिकाणी मोटर सायकल स्लीप होण्याच्या घटना घडत असून कोणाला काही गंभीर दुखापत झाल्यास जबाबदार कोण राहणार अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या कडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देवून तात्काळ काम सुरू करण्यात यावे अशी मागणी खिर्डी वासियांसह वाहन धारकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!