रावेर तालुक्यातील सावखेडा, खिरोदा सह परिसरात टपऱ्यांवर बिनधास्त घेतल्या जातात सट्टा- मटक्याच्या बीटा
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावखेडा व परिसरात बिनधास्त पणे अवैध सट्टा- मटका सुरू आहे, परिसरातील गावांमध्ये टपऱ्यावर खुलेआम सुट्ट्याच्या बीटा घेतल्या जातात. सावखेडा येथील सट्टा पिढीवर कारवाई का केली जात नाही?
रावेर तालुक्यातील सावखेडा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून सट्ट्याची पिढी बिनधास्त पणे सुरू असून या सट्ट्याच्या पिढी मार्फत परिसरातील सावखेडा बु, सावखेडा खु. चिनावल, रोझोदा, खिरोदा, कळमोदा, जानोरी, चिचाटी, लोहारा, कुंभारखेडा, गौरखेडा,सह आदी गावांमध्ये एजंट टपऱ्यावर सट्टा घेण्याचे काम करतात काही टपऱ्या तर फक्त स्पेशल सट्टा-मटकाच लिहिण्याचे काम करतात.
सट्ट्या-मटक्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याची उदाहरणे असताना कारवाई करून बंद का केला जात नाही?, यात वरपर्यंत अनेकांचे आर्थिक हितसंबंध जपले आहे का? असा सवाल ग्रामस्थ करीत असून , सावखेडा, खिरोदा, चिनावल , रिझोदा, कुंभारखेडा या सह इतर गावांच्या ग्रामस्थां कडून सट्टा-मटका येथून कायम स्वरूपी बंद व्हावा अशी मागणी केली जात आहे.