तापी परिसरात विद्युत मोटारी फोडून तारांची चोरी,चोरट्यांची दिवाळी गोड, शेतकरी मात्र हवालदिल
तापी परिसर ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री शेतातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या तब्बल पाच सहा विद्युत मोटारी फोडून त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्याची घटना मध्यरात्री घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की रावेर तालुक्यातील तापी परिसरातील तासखेडा शिवारातील तापी नदी काठी शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युत मोटारी ठेवल्या असतात. त्याच मोटारींची एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मोटारीची मध्यरात्री चोरट्यांनी तोटफोड करुन त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करत दिवाळी गोड केली यात १) सुभाष ब्रिजलाल चौधरी,२) दिपक शरद पाटील,३) अशोक देवचंद कोळी,४) सुरेश बळीराम कुंभार,५) ज्ञानेश्वर चुडामण चौधरी व ६) सुनिल रामदास चौधरी या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका देत पोलीसांना एक प्रकारे आव्हानच देण्याचे काम चोरट्यांकडून देण्यात आले आहे.
मध्यंतरीचा काही काळ शांत झालेले चोरीचे सत्र पुन्हा सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. वांरवार होत असलेल्या विद्युत मोटार चोरीच्या घटनांवर स्थानिक पोलीस प्रशासनाने अंकुश लावण्याची मोठी गरज आहे
तापी परिसरातील शेतकऱ्यांना ही एक मोठी समस्या त्रासदायक ठरत आहे आणि त्याच गंभिर समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी शेतकरी हे प्रशासनाकडे तक्रारी करून देखिल प्रशासन हे गार्भियाने लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करित आहे. तसेच फक्त मन समाधानासाठी तात्पुरत्या स्वरुपात रात्रीची गस्त( पेट्रोलींग) घातली जाते. नंतर जैसे थे ची स्थिती निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. जर नेहमी रात्री तापी परिसरात पोलीसांनी पेंट्रोलींग केली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता असाही थेट आरोप पोलीस प्रशासनावर नांगरिकांव्दारे लावला जात आहे. तापी परिसरात पुन्हा रात्रींची गस्त सुरु करावी अशी नागरिकांची पोलीस प्रशासनाला मागणी आहे.