तासखेडा गावात घाणीचे साम्राज्य, ग्रामपंचायतीला पडला स्वच्छतेचा विसर
तासखेडा,ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तासखेडा गावच्या ग्रामपंचायतीला गावातील स्वच्छतेचा विसर पडला की काय? पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अजूनही ग्रामपंचायत साखर झोपेतच आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की साधारणता ७ जून पासुन मान्सुनचे आगमन होत असते त्या अगोदर आपण शेती सह इतरही सर्व कामे उरकऊन घेत असतो. तसेच सर्वत्र आपल्या हद्दीतील गावातील स्वच्छता, नाले साफ सफाई ची कामे पूर्ण करुन घेतले जतात,मात्र या उलट कारभार हा तासखेडा ग्रामपंचायतीचा असून जुन महीना काय जुलै महिन्याची ५ तारिख येवून सुद्धा साफसफाईच्या कोणत्याही कामाला सुरुवात केली नसुन गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील सांडपाणी तसेच गटारी तुंब भरल्या असुन ठिक ठिकाणी कचरा पडून घाणीचे साम्राज निर्माण झाले आहे. याकडे ग्रामपंचायतीने गंभीर्गाने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पाऊस चालू असून रोगराही साठी पोषक वातावरण निर्माण होवून गावांमध्ये साथिचे आजार पसरु शकतात. यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण थांबवाव व साखर झोपेत असलेल्या ग्रामपंचायतीने जागे व्हाव अशी गावकऱ्यांची ईच्छा आहे.