खिर्डी येथे पंचगव्य सात दिवसीय शिबिराचे उदघाटन
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील सामाजिक संस्था तत्पर फाउंडेशन व वरणगाव येथील शाम लीला गोसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पंचगव्य सात दिवसीय शिबिराचे निंभोरा पोलीस स्टेशनचे सा.पो.निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या हस्ते आरंभ करण्यात आले.
या शिबिरात पंचगव्य चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा,व स्नायु व हाडांचे उपचार असे अनेक उपचार करण्यात येत असून शिबीर २९ जुलै ते ५ अगस्ट पर्यंत असणार आहे.शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प.स.सदस्य दिपक पाटोल,खिर्डी बुद्रुक सरपंच मधुकर ठाकूर,खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक,ग्राम सेवक एस.आर.पाटील,पंचगव्य तज्ञ दीपक पुजारी, निसर्गोपचार तज्ञ योगेश सोनवणे,सहायक अरुण पुजारी, जयंत पाटील, विजय पाटील,छोटू पाटील,विनोद पाटील,निळकंठ बढे,विलास पाटील,किरण नेमाडे,मोहिनी नेमाडे,शेख अस्लम, राजेंद्र बोरसे,महेंद्र कोचुरे,भीमराव कोचुरे,उमेश तायडे,तसेच तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांत कोळी,सचिव प्रवीण धुंदले,कांतीलाल गाढे,सतीश फेगडे,प्रदीप महाराज पंजाबी,शेख इद्रीस,संकेत पाटील,रितेश चौधरी,सादिक पिंजारी,अंकित पाटील,डिगंबर तावडे,आदी सह उपस्थित होते.