खिर्डी येथे डासांचा वाढता प्रादुर्भाव. नागरिक त्रस्त
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी येथे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डास प्रतिबंधक कॉइल्स, व अगरबतीचा नियमित वापर करावा लागत असल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.गावातील बहुतांश ठिकाणी गटारी तुडुंब भरलेल्या असून सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत आहे.तसेच संध्याकाळच्या वेळेस डास नागरिकांना निवांत बसू देत नाही.
तसेच सध्या हिवाळ्याचे दिवस असूनही नागरिकांना फॅन चा आसरा घ्यावा लागत आहे. विजेची बचत करण्याचा मानस असला तरी डास चावल्यास हिवताप होवू नये.म्हणून नागरिकांना नाईलाजास्तव विजेचा वापर करावाच लागत असल्याने विजबिलाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून याकडे मात्र आरोग्य विभागाचे फारसे लक्ष दिसत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे.तसेच ग्राम पंचायत प्रशासनाने धूर फवारणी करीता फॉर्गिंग मशीनची खरेदी करण्यात आली असली तरी ती फॉर्गिंग मशीन नादुरुस्त असल्याचे समजत आहे.डासांचा नायनाट होत नसल्याने खाजगी दवाखान्यात हिवतापाच्या रुग्णांची गर्दी वाढत असल्याचेही दिसत आहे.तसेच गटारिंची नियमित साफसफाई होत नसल्याने विषाणूजण्य आजार फैलवण्याची शक्यता नाकारता येत नाही.या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने योग्य ते लक्ष देवून डास प्रतिबंधक औषधांची फॉर्गींग मशिनद्वारे फवारणी करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.