निंभोरा बुद्रुक येथील उड्डाणपुलावर पथदिवे बसवा, तीव्र आंदोलनाचा इशारा
निंभोरा बुद्रुक ता. रावेर. प्रा.दिलीप सोनवणे। रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथील नव्याने तयार करण्यात आलेला उड्डाणपूल गेल्या ऑगस्ट महिन्यापासून वाहतुकीसाठी खुला झालाय खरा पण पुलाच्या वरती व खाली व सर्विस रोडवरती कुठेही लाईट लावलेले नाही तसेच निंभोरा गाव आणि खिर्डी परिसरातील अनेक स्त्री पुरुष युवक युवती मॉर्निंग वाकला आणि रात्री शतपावलीसाठी फिरायला येत असतात परंतु रात्री या उड्डाणपुलावर व खाली मोठ्या प्रमाणात अंधार असतो त्यावेळेस वाहतुकीला व शतपावली करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो .
अंधाराचा फायदा घेऊन अनेक जण उड्डाणपुलावर दारू पिण्यात मग्न असतात यामुळे अघटीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही तरी लोक प्रतिनिधी, प्रशासनासह संबंधितांनी त्वरित उड्डाणपुलावर व खाली तसेच सर्वीस रोडवर त्वरीत पथदिवे लावावे लवकर न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच सदर उड्डाणपूल ठेकेदाराने हा विषय हलक्यात घेऊ नये, असा इशारा शिवसेनेचे वा य डी पाटील तसेच माजी ग्रा.प सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र सोनवणे यांनी दिला आहे.