रस्ता आहे की बोगदा? काटेरी झुडुपा मागे लपलय गाव! दुसखेडा येथील प्रकार
तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज. अनिल इंगळे। यावल तालुक्यातील दुसखेडा गावात प्रवेश करायचा असेल तर सर्वप्रथम काटेरी झुडुपांचा अडथळा पार करावा लागेल . अशि स्थिती दुसखेडा ग्रामपंचायतीच्या सुस्त कारभारामुळे तेथिल नागरिकांवर येवून ठेपली आहे
या बाबत अधिक सांगायचे झाले तर तापी नदी काठी बसलेल दुसखेडा हे गाव असून या गावाला मुख्य व जवळची बाजारपेठ भुसावळ ही असुन नागरिकांची भुसावळ येथे ये-जा सुरुच असते. गावाला लागुनच रेल्वे स्टेशन सुद्धा असल्याने. रेल्वे विभागाने गेटमुळे या गावासह संपूर्ण तापी परिसराला त्रासादायक ठरत असल्यामुळे गेट बंद करून बोगदा तयार करण्यात आला. नागरिकांनी सुद्धा बोगद्याजवळुनच गावात जाण्यासाठी चोरमार्ग( शॉर्टकट) तयार करून त्याच रत्याने ये – जा करीत असतात . मुख्य रस्त्याने जायचे झाले तर किमान ५०० मिटरचे अंतर कापावे लागत असल्यामुळे पाई जाणारे व मोटार सायकलीने जाणारे या शॉर्टकट मार्गाचाच वापर करतता.
मात्र चारचाकी वाहनांना मुख्य रस्त्यांचाच वापर करावा लागतो. त्यांना या काटेरी झुडपांमुळे खुप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गाडी समोर दुसरे वाहन येवून ठेपले तर एकाला माघारी जावे लागते .
आजच्या स्थितीला मुख्य रस्त्याची स्थिती अतिशय विदारक अशी बघायला मिळत आहे. रस्त्याच्या दोघे बाजूने काटेरी झुडपे मोठ मोठी होवून संपूर्ण रस्ता झुडपांनी व्यापला गेला आहे. फक्त एक मोटार सायकल जाईल एव्हढीच जागा मोकळी सुटलेली आहे. अश्याच प्रकारची स्थिती राहीली तर लवकरात लवकर ती पण जागा व्यापली जाईल यात तिळमात्र शंका नाही. मुख्य प्रवेशव्दाराची अशी स्थिती बघीतल्या नंतर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकामध्ये नाराजीचे सुरु निघत आहे. काहीच्या मते तर गाव काटेरी झुडुपांमागे लपवण्याच काम तर ग्रामपंचायत करत नाही ना.? अशी देखील शंका व्यक्त केली जात आहे. तरी सुस्त ग्रामपंचायतीने या समस्येकडे लक्ष केंद्रित करून काटेरी झुडपांपासून रस्त्याला तसेच गावाला मोकळे करावे अशी तेथिल नागरिकांची मागणी आहे.