भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सांस्कृतिक कार्यक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, खिर्डी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात सपोनि गणेश धुमाळ यांचे प्रतिपादन

खिर्डी, ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज.प्रतिनिधी। सांस्कृतीक कार्यक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व मिळतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणीत करावा असे प्रतिपादन निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी केले रावेर तालुक्यातील खिर्डी येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालयात लक्ष्मण पाटील जुनियर कॉलेज च्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील, उपाध्यक्ष डॉ. सुधीर पाटील, सचिव पाटील सहसचिव डॉ. पाटील हे होते. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी, इयत्ता अकरावी- बारावीच्या विध्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या अंगी असलेले अनेक कलागुण सादर केले यामध्ये लावण्या, नाटक देशभक्तीपर गीते गायले नाटकामध्ये बेटी बचाव बेटी पढाव सावित्रीबाई फुले तसेच अंधश्रद्धा यावर आधारित नाटकांनी प्रेक्षकांची माने जिंकली यावेळी सांस्कृतिक समिती प्रमुख शारदा सपकाळे डीपी देशमुख यांनी सूत्रसंचालन तर आभार बी पी देहाडे यांनी मानले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!