श्री दत्त मंदिर संस्थान सावदा येथून जाळीचा देव पदयात्रेला प्रारंभ
सावदा/खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। श्री दत्त मंदिर संस्थान सावदा येथून जाळीचा देवसाठी पदयात्रा काढण्यात आली यात्रेत सुमारे दीडशे भाविक एकत्र होते प्रारंभी सकाळी श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे पूजन करून दर्शन घेऊन यात्रा प्रारंभ झाला.
ही यात्रा चांगदेव,हरताळा, बोदवड ,बेटावद, सावळदबारा इत्यादी तीर्थक्षेत्रावरून जाळीचा देव येथे दिनांक 4 फेब्रुवारीला पोहोचेल पाच फेब्रुवारी चा यात्रा महोत्सव आटोपून तेथेच समारोप होईल या यात्रेसाठी परिसरातील सावदा,कोचुर ,मोहराला, वरणगाव, कर्की ,वेल्हाला येथील सदभक्त मंडळी आहेत कृष्ण मुर्तीचे पूजन अनिल महाजन व सौ विद्या अनिल महाजन यांनी केले ही सर्व मंडळी जाळीचा देव येथे निघाली आहे.या पदयात्रेला 17 वे वर्ष झालेले आहे.यात्रेचे आयोजन आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री सावदा व महंत राजकुमार दादा वरणगाव यांनी केलेले आहे