प्रभू श्रीराम यांचे बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड याना जोडे मारून सावद्यात निषेध
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रभू श्रीराम यांचे बद्दल अवमानकारक वक्तव्य करून तमाम रामभक्त आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखविल्या. रावेर तालुक्यातील सावदा शहरात या कृत्याचा निषेध भाजपा कडून आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आला.
वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी मासाहार केला. प्रभू श्रीराम बहुजनांचा राम आहे. आणि बहुजन मांसाहारी आहेत, आम्ही रामाच्याच वाटेवर चालत आहोत असे घाणेरडे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले.या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखाविल्या असून जितेंद्र आव्हाडांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी उपस्थितांतर्फे करण्यात आला,या वेळी सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी भाजपा शिवसेना युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक उपस्थित होते.