पत्रकार दाम्पत्याचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील प्रगतशील शेतकरी,दै. पुण्यनगरीचे पत्रकार आणि गायत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे प्रोप्रायटर सुमित उर्फ मुन्ना पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी पल्लवी पाटील यांनी ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ या ओळीस साजेसा असा संकल्प केला आहे.
तांदलवाडी गावातील पत्रकार सुमित पाटील आणि त्यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प घेतला आहे जळगाव येथील आर सी बाफना फाउंडेशन ट्रस्ट द्वारा संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढी मध्ये त्यांनी रितसर अर्ज भरून नेत्रदान संकल्प कार्ड घेतले आहे.आपण मेल्यावर आपल्या नेत्रा मुळे निदान काही जण भगवंतांनी बनवलेल सुंदर अस विश्व पाहू शकतील हा एकच उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून दोघांनी हा निर्णय घेतला आहे.ज्यांना शक्य असेल त्यां व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान नक्की करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. सर्व स्तरा मधून या दाम्पत्याने घेतलेल्या धाडसी आणि स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.