खिर्डी–ऐनपूर रस्त्याने अखेर घेतला मोकळा श्वास!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। खिर्डी ते ऐनपूर रस्त्याच्या दुतर्फा अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली होती यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधीं कैफियत मांडल्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढण्यात आली आहे.
अधिक असे की, खिर्डी ते ऐनपूर रस्त्याच्या दुतर्फा अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असून हा रस्ता रावेर ते सावदा या दोन्ही शहरांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरून मोठया प्रमाणात लहान मोठी अवजड वाहने जात असून साईड देण्यास जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात आजूबाजूच्या गावातील केळी व्यापारी, शेत मजूर असे शेकडो लोक दररोज या रस्त्यावरून येजा करतात तसेच खिर्डी हे बाजारच मुख्य गाव तसेच किराणा, दवाखाना, कपडे घेण्यासाठी येथे येत असतात त्याचबरोबर मजूर वर्ग आजू-बाजूचे खेड्यातील लोक हे कामानिमित्त येत असून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यासंदर्भात मेन रोड वर रस्त्याने असलेले काटेरी झुडपे काढण्या बाबत अनेक लोकांनी सा.बा. विभाग तसेच पंचायत समिती सभापती सौ.कविताताई हरलाल कोळी यांचे कडे कैफियत मांडली असता त्यांनी लागलीच या सर्व गोष्टींची पाहणी करून. लगेच प्रत्यक्षात आज जेसीबी व ट्रॅक्टर च्या साह्याने काटेरी झुडपे काढण्या आले.
या प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी कांडवेल, गफूर(किरण) कोळी सरपंच खिर्डी बु भाजयुमो.चे उपाध्यक्ष भूषण पाटील वाघाडी, दुर्गेश पाटील, लखन पाटील-धामोडी, गंभीर पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.