भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रॉकेल ही नाही,गॅस ही नाही, खिर्डी येथे अनेक लाभार्थी योजनां पासून वंचित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (भिमराव कोचुरे)। येथे रॉकेल वितरण स्टॉक हजार ते पंधराशे लीटर चा असताना उज्वला गॅस योजने मुळे रॉकेलचा स्टॉक कमी कमी होत आहे. परन्तु येथे रेशन कार्ड वर मिळणारे हक्काचे रॉकेल पूर्ण पने गायब झाले की काय असा प्रश्न नेहमी सर्वसामान्य लोकांना पडत असतो.या पासून आजही अनेक लोक वंचित राहिले आहे.त्यांना रॉकेलही मिळत नाही,मोफत मिळणारा उज्वला योजनेचा गॅसही मिळत नाही.

अशा अनेक लोकांकडे गॅस जोडणी नसल्या मुळे महीला वर्गाला स्वयंपाक बनविणे, पाणी तपविने असे अनेक प्रकारची कामे ही आजही पारंपरिक पद्धतीने चुलीवर करावे लागतात.त्यातच कुऱ्हाड बंदी मुळे सरपण मिळणे ही कठीण होते.अशातच ओले सरपण असल्यास पेटविण्या करिता रॉकेल ची आवश्यकता भासते पण रॉकेल मिळते कुठे, त्यामुळे सकाळी चूल पेटविण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो त्यामुळे वायू प्रदूषण वाढत असून धुरा मुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

रेशन कार्ड ची ऑनलाईन पडताळणी केली असता त्यावर रॉकेल उपलब्ध असल्याचे दिसते पण रॉकेल मात्र मिळत नाही.शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर रॉकेल जनतेसाठी उपलब्ध असताना महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात मात्र रॉकेल कित्येक वर्षांपासून बंद केले आहे,ज्या लोकांकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना रॉकेल मिळणे शासनाने बंद केले ,परंतु ज्या लोकांकडे गॅस कनेक्शन नाही अशा गोर गरिबांना अनुदानातून मिळणारे तरी रॉकेल शासनाने उपलब्ध करून द्यावे नाहीतर उज्वला योजनेतंर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून द्यावे.तहसीलदार यांनी स्वत पुढाकार घेवून रेशन दुकानदार मार्फत खरोखर कोणाकडे गॅस कनेक्शन नाही याची चौकशी करण्यात यावी आणि जे लोक वंचित आहे त्या लोकांना न्याय मिळवून द्यावा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!