वारंवार खंडित होत असलेल्या विज पुरवठयामुळे खिर्डी ग्रामस्थ आक्रमक
खिर्डी ता,रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी।। रावेर तालुक्यतील ऐंनपुर येथील 33 केव्ही.सबस्टेशन द्वारे खिर्डी फिडर वरून परिसरातील आठ गावांंना वीज पुरवठा केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून मनमानी पध्दतीने ओव्हरलोड च्या नावाखाली तर तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली तासनतास वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो.
त्या मुळे कधी पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही तर कधी गिरणीत दळण अडकून पडते.गोर गरीब व सर्वसामान्य माणसाच्या घरात पीठ नसले तर त्याला वीज नसल्यामुळे उपाशी झोपावे लागणार की काय? तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्यावर सुद्धा वारंवार वीज गायब होत असते.तसेच खिर्डी येथेच ओव्हर लोड चे प्रमाण का वाढले गावात एखादी एमआयडीसी सुरू झाली की काय? त्यामुळे ओव्हर लोड तर वाढत नाही ना? यामुळे सध्या खिर्डी येथील ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे खिर्डी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी खिर्डी येथील समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
असल्