कोष्टी समाज महिला मंडळा तर्फे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रम
सावदा,ता.रावेर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। सावदा येथील कोष्टी समाज महिला मंडळातर्फे शनिवारी तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.
मकरसंक्रांतीनिमित्त दिनांक २८/०१/२०२३ रोजी शनिवार दुपारी ३ ते ६ सावदा शहरातील कोष्टी समाजातील महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व एक लहान मुलीला गोरक स्नान म्हणून पण कार्यक्रम करण्यात आला आणि यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह १०० ते १५० पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोष्टी महिला मंडळ. सावदा यांनी आदींनी परिश्रम घेतले.