खिरोदा येथील तलाठ्या सह कोतवाल एसीबी च्या जाळ्यात, चार हजारांची लाच भोवली
खिरोदा.ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे , व कोतवाल शांताराम यादव कोळी , या दोघाना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने चार हजार रुपयांची लाच घेताना आज दि ६ एप्रिल रोजी रंगेहात पकडले.
या बाबत अधिक माहिती अशी की,वडीलोपार्जीत शेती रावेर तालुक्यातील खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये असून तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे , व कोतवाल शांताराम यादव कोळी ,यांनी ४,०००/रु.लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम तलाठी न्हायदे व कोतवाल कोळी यांनी स्वतः सजा खिरोदा तलाठी कार्यालय खिरोदा ता.रावेर, जि .जळगाव .येथे स्वीकारली. म्हणून प्रमोद प्रल्हाद न्हायदे , वय-४५ वर्ष, तलाठी, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव. (वर्ग-३)
रा. गणेश कॉलनी, फैजपुर ता.यावल जि.जळगाव. आणि शांताराम यादव कोळी , वय-५२ वर्ष, कोतवाल, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव. (वर्ग-४)
रा.खिरोदा, ता.यावल जि.जळगाव. या दोन्ही आरोपीतां विरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही घटना आज ६ एप्रिल रोजी घडली.
सापळा पथकात शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. यांनी कारवाई केली.