चिनावल ला छावणीचे स्वरूप, १५ पोलिस अधिकारी, ४०० पोलीस कर्मचारी,३० सी सी टी व्ही कॅमेरे
सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। श्री गणेशाचं आगमन झालं, आज सातवा दिवस, जिल्ह्यासह राज्यभरात गणपतीचे पाचव्या दिवशी,सातव्या दिवशी, अकराव्या दिवशी तर काही ठिकाणी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते.
आज २५ सप्टेंबर सोमवार ,आज सातवा दिवस, आज रावेर तालुक्यातील चिनावल येथील श्री गणेश विसर्जन होणार असून चिनावल हे रेकोर्ड ला सेन्सिटिव्ह असल्याने गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी,- मंडळांचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांच्या आता पर्यंत पोलीस प्रशासनाने चार बैठका घेतल्या.
१५ पोलिस अधिकारी, ४०० पोलीस कर्मचारी,३० सी सी टी व्ही कॅमेरे
चिनावल गावात बंदोबस्त साठी मिरवणूक मार्गावर ३० सी सी टी व्ही कॅमेरे, पूर्ण मार्गावर मरक्यूरी लाईट, फ्लॅट लाईट व्यवस्था, करण्यात आली असून आज स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह २ डी वाय एस पी, १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरिक्षक, १ एस आर पी प्लाँटून,१ आर सी पी प्लाँटून ,३ स्ट्रायकीग फोर्स ,१० फाँरेस्ट कंमाडो, १०० पोलिस कर्मचारी, १०० होमगार्ड, एल सी बी पथक, गोपनीय पथक, मद्य तपासणी, आर टी ओ पथक,
असा जवळजवळ ४०० पोलीस कर्मचाऱ्यांचा एवढा मोठा पोलीस फौजफाटा राहणार असून मिरवणुकीवर ड्रोन कँमेरा, दुर्बिण, बी डी एस पथक, डेसिबल मिटर चे लक्ष राहणार असून आजचे श्री विसर्जन मीरवणूक शांततेने व आनंदाने पार पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, आजच्या मिरवणुकीत गावातील १५ गणेश मंडळ भाग घेत असून या पूर्वी विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डी वाय एस पी राजकुमार शिंदे ,सावदा पोस्टे चे सपोनि जालिंदर पळे उप निरीक्षक विनोद खाडबहाले,यांचे सह गावात रूट मार्च काढला,