भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

केळीच्या घळांवर तणनाशक फवारून लाखो रुपयांचे नुकसान, पीक नुकसानीची मालिका सुरूच

चिनावल,ता रावेर मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यतील चिनावल येथील चंद्रकांत चुडामण पाटील यांच्या कोचुर रस्त्यावरील शेतातील केळीच्या घळांवर तणनाशक औषध फवारून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. घड लागलेली केळीची झाडे तसेच केळीची खोडे समाजकंटकांकडून लक्ष्य केले जात आहे. चिनावल वडगाव परिसरात असे प्रकार नेहमीच घडत असतात,

नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी चिनावल येथील शेतकरी दगडू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतातील सुमारे २५०० केळीची खोडे,डॉ मनोहर पाटील यांचे ६०० खोडे, पंकज नारखेडे याची १६०० केळीची खोडे समाजकंटकांनी कापून लाखों रुपयांचे नुकसान केले होते ,या बाबत मोठा वाघोदा येथे अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत आंदोलन सुद्धा करण्यात आले होते ,याआधीही सावदा येथेही मोठे आंदोलन करून रस्ता रोको केला होता, एव्हढे करूनही शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान करणे कमी झालेले नाही , परिसरात व रावेर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची केळीची खोड कापून उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे, अशा घटनांमध्ये मोठी वाढ झालेली असताना पुन्हा चिनावल येथील चंद्रकांत चुडामण पाटील व गणेश हरी नेमाडे यांच्या कोचुर रस्त्यावरील शेतातील सुमारे १७०० ते १८०० केळीच्या घळांवर तणनाशक औषध फवारून लाखो रुपयांचे नुकसान केले ही घटना ६ जानेवारी रोजी लक्षात आली,या बाबत सावदा पोलिसस्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे, शेती पिकाचे नुकसान करण्याची मालिकाच सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

त्यातल्या त्यात विशिष्ट संघटनेकडून यासाठी आर्थिक रक्कम देण्यात येऊन केळी बागा उध्दवस्त केल्या जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे शेतकरी बेजार झाला असून या बाबत शेतकऱ्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यासंदर्भात सखोल चौकशी होऊन केळीचे उभे खोड कापण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्या संघटनेचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली. चौकशी करून शेतकर्यांच्या केळीचे नुकसान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना या वेळी देण्यात आल्या, तसेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक एस.राजकुमार यांनीही या परिसरात ग्रामरक्षक दल स्थापना करण्यात येईल. तसेच अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येऊन त्यांचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे शेतकर्‍यांना आश्वासित केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!