आधीच खराब असलेल्या लूमखेडा रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। सावदा- मुक्ताईनगर रस्त्यावरील मुख्य फाटयापासून ते लुमखेडा गावापर्यंत दोन किलोपर्यंतच्या रस्त्यावर दोन महिन्यांपासून पडलेल्या खडीमुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहेत.
तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत खराब व खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरुन वाहन चालवतांना वाहनधारकांना चालवतांना जीव मुठित घेवून अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.अनेक वेळा खड्डे वाचविण्याच्या नादात किरकोळ स्वरूपाचे अपघात सुध्दा घडलेले आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून सदरच्या रस्त्यावर खडीचे ढिग पडलेले असून आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर कोपरी खडी व दगड पसरल्याने दुचाकी स्लीप होवून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत.तसेच लहान मोठया वाहनांची अवस्था खिळखिळी होत असून टायर पंक्चर होऊन मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत असून.या सर्व प्रकाराकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.संबंधित विभागाने त्वरित लक्ष देवून समस्या मार्गी लावावी अशी मागणी लुमखेडा येथील ग्रामस्थ करीत आहेत.