लम्पी स्कीन आजाराची लागण,रणगांव येथे बैलाचा बळी
तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। राज्यात लम्पी स्कीन डिसीज या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन अनेक गुरांना याची लागण झाली असून यात गुरे दगावत आहेत. यात रावेर तालुक्यातील रणगाव येथे लम्पी स्कीन डिसीज या आजाराची लागण होवूण समाधान गोविंदा पाटील यांच्या बैलाचा बळी गेला आहे.
रावेर तालुक्यातील रणगाव येथे बैलाला लम्पी स्कीन डिसिज ची
लागण झाल्याने बैल मालक समाधान पाटील यांनी गहुखेडा येथिल डॉ. आसाराम फत्तू बारेला ( पशुधन पर्यवेक्षक) यांना माहिती दिली असता डॉक्टरांनी तत्काळ बैलाला औषधोपचाराला सुरवात केली. सलग ३ दिवस उपचार घेत असतांना सुद्धा बैलाला काहीही फरक पडत नसल्याने बैल मालकांनी खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेण्याचे ठरवले असता खाजगी डॉक्टरांकडून सुद्धा फरक न पडल्याने अखेर बैल दगावला आहे. यामुळे परिसरात पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण परसले आहे.