रावेर तालुक्यात ‘मांडूळ’ जातीचे सर्प जप्त, वन विभागाची मोठी कारवाई
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील रिझोदा येथे देवेंद्र लिधुरे यांचे कडून मांडूळ जातीचे सर्प वनविभागाने जप्त केले.
आज दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी दि.वा.पगार,वनसंरक्षक धुळे, यांच्या मार्गदर्शनाने प्रथमेश हाडपे .उपवनसंरक्षक यावल यांनी वनक्षेत्रपाल यावल पूर्व विक्रम पद्मोर, वनक्षेत्रपाल फिरते पथक आनंदा पाटील, वनक्षेत्रपाल रावेर अजय बावणे यांच्यासह गुप्त बातमीनुसार मौजे रोझोदा येथील रहिवासी नामे देवेंद्र गिरधर लिधुरे यांच्या राहत्या घराची झडती घेऊन मांडूळ(red sand boa)जातीचे सर्प जप्त केले.सदर आरोपीस भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम1972 अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली सदर कार्यवाहीस पोलीस पाटील रोझोदा, वनपाल रावेर, रवींद्र सोनवणे वनपाल फैजपूर अतुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तडवी वनरक्षक- संभाजी सूर्यवंशी,गोवर्धन डोंगरे, तुकाराम लवटे, सुपडू सपकाळे,कृष्णा शेळके, युवराज मराठे, राजू बोंडल, अरुणा ढेपले,आयशा पिंजारी, सविता वाघ वाहन चालक आनंद तेली, इमाम तडवी सचिन पाटील, विनोद पाटील, यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली. पुढील तपास चालू आहे.