चिनावल सेंट्रल बँकेचे अनेक खातेदार खाते बंद करण्याच्या मार्गावर
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथून जवळच असलेल्या चिनावल येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक मोठी बँक असून या बँकेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून बँकेचे अनेक ग्राहक खातेदार खाते बंद करणार असल्याचे खतेदारांनी सांगितले.
चिनावल येथे नॅशनलाईज बँक म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक असून चिनावल व परिसर, केळी पिकवण्याच्या बाबतीत पंचक्रोशीत प्रसिद्ध असुन येथे अनेक केळीचे व्यापारी, शेतकरी,खाजगी व्यक्ती,व काही सहकारी व शैक्षणिक संस्था असल्याने या बँकेशी दररोज लाखो रुपयांचे व्यावहार होत असतात .तसेच या परिसरत पगारदार वर्ग, पेन्शनर,विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ,बँकेतून पैसे काढणे, ठेवणे,पासबुक भरणे अशा एक ना अनेक कामासाठी खतेदारांचा बँकेशी संबंध येत असतो ,येथील बँक कर्मचारी खातेदारांना व्यवस्थित माहिती व मार्गदर्शन न करता उर्मट,उद्धट पणाची वागणूक देत ग्राहकांना मुद्दाम रांगेत तटकळत ठेवत असल्याने खातेदार नाराज असून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे ,पास बुक तर केव्हाच भरून देत नाहीत कित्येक तास उभं रहावं लागत,अशा अनेक बाबत अनेक तक्रारी सुदधा केल्या गेल्या असल्याची माहिती असून खातेदार बँकेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून या त्रासामुळे खाते बंद करण्याच्या मार्गावर आहेत.