भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

चिनावल महादेव मंदिरातील नंदी पाणी पिऊ लागल्याने, भाविकांची झाली गर्दी !

चिनावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  रावेर तालुक्यातील चिनावल येथील महादेव मंदिरात असलेली नंदीची मूर्ती पाणी पीत असल्याचे भाविकांच्या निदर्शनास आल्याने ही माहिती गावात पसरताच भाविक ग्रामस्थांनी पाण्याचे ग्लास, चमचा, तांबे घेऊन गर्दी केली आहे. भाविक भगवंताचा चमत्कार असल्याचे मानत आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल येथे आज सकाळपासून येथील महादेव वाड्यात असणार्‍या महादेव मंदिरातील नंदीची मूर्ती ही पाणी पित असल्याचे भाविकांना दिसून आले आणि भाविक भक्तांनी नंदीच्या मूर्तीजवळ चमच्याने पाणी घेऊन गेले असता ते मध्ये शोषले जात असल्याचे भाविकांना आढळून आणि यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने काही तासांमध्येच हे वाऱ्यासारखे परिसरात पसरल्यानंतर शेकडो भाविकांनी चिनावल येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी धाव घेतली आहे. अनेक भाविकांनी तेथील नंदीच्या मूर्तीला पाण्याने भरलेला चमचा लावल्यानंतर हे पाणी मूर्तीमध्ये शोषले जात असल्याची अनुभूती घेत आहे. यामागे दैवी चमत्कार असल्याची भाविकांची भावना आहे. तर सदरील घटना वैज्ञानिक गुणधमामुळे होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात यासंदर्भातील नंदीची मूर्ती पाणी पित असल्याच्या आणखी काही घटना समोर आल्या असून शिरसोली, सावखेडा या गावांमध्येही अशी घटना पाहायला मिळाल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!