“मंडे टू मंडे न्युज” इम्पॅक्ट ; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईने दणाणला तापी परिसर
सावदा ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील तापी परिसरात अवैध दारू व्यवसाय मोठया प्रमाणावर सुरू असल्याचे वृत्त ” मंडे टू मंडे न्युज” ने प्रसारित करताच तीन तासांच्या आत झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वृत्ताची दखल घेत अँक्शन मोड मध्ये येत तत्काळ तापी परिसर गाठला व उदळी सह तासखेडा, रायपुर, दुसखेडा पर्यंत धकड कारवाई करत अवैधरित्या सुरु असलेले हातभट्टी दारुचे अड्डे, दारूचे रसायन उध्वस्त करत अवैध दारूचा धंदा चालवत असलेल्यांना चांगलाच दणका दिला.
हे ही वाचा– तापी परिसरात अवैध दारू धंद्यांचा महापुर, उत्पादन शुल्क विभाग हप्ते घेत असल्याचा निघतोय सुर
तापी परिसरात अवैध दारू व्यवसाय मोठया प्रमाणावर सुरू असल्याचे वृत्त ” मंडे टू मंडे न्युज” ने काल प्रसारित केले होते. बातमी प्रसारित होताच अवघ्या तीन तासांच्या आतच राज्य उत्पादन शुल्क विभागांच्या पथकाने तापी परिसरात अवैध धंदे चालकांवर कारवाई केली. सदरील धडक कारवाईने परिसरातील अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून परिसरातील नागरिकांना या कारवाईमुळे एक मोठा दिलासा मिळाला आहे. काही नागरिकांच्या मते या प्रकारची कारवाई ही वेळोवेळी झाली पाहीजे जेणे करून या अवैधरित्या चालत असलेल्या दारुच्या धंद्यांचे कंबरडे मोडले जाईल.
काल सकाळी जवळ जवळ १० वाजे पासून संध्याकाळी ७ वाजे पर्यंत दिवसभर ही कारवाई सुरू होती. ही अशी मोहीम कायम राबवावी व तापी परिसरावर विशेष लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.