तापी मातेचा जन्मोत्सव, गेल्या २६ वर्षा पासुन केला जातोय साजरा
तासखेडा, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे। रावेर तालुक्यातील तापी नदीच्या काठी बसलेल्या गांवा पैकी रणगाव हे एक असे गांव आहे की या गावात गेल्या २६ वर्षा पासुन गावातील प्रगतशिल शेतकरी रमेश चुडामन चौधरी हे १९९६ सालापासून आषाढ शुद्ध सप्तमी हा दिवस तापी मातेचा जन्मोत्सव म्हणुन मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
रावेर तालुक्यातील तापी काठी वसलेले रणगाव या गावी तापी मातेचा जन्मोत्सव गेल्या २६ वर्षा पासून साजरा केला जातो, आजही हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे,या कार्यक्रमात गावातील ग्रामस्त मोठ्या आनंदाने सहभागी होतात. सर्व प्रथम रणगांव गावचे ग्रामदैवत बन्सी बाबा यांचा अभिषेक करुन पुजन केले जाते. नंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुजन करुण तापी मातेची पुजा प्रविण रमेश चौधरी यांच्या हातून पुजा केली जाते. याच पुजाअर्चने बरोबर पंचक्रोशित गावानां दर साला प्रमाणे रमेश चौधरी यांच्याकडून भोजनाची व्यवस्था केली जाते.
आज सुद्धा आषाढ शुद्ध सप्तमी असल्यामुळे तापी जमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.