भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

२६ नोव्हेंबर पासून रोझोदा येथे संगीतमय रामायण कथा अखंड हरीनाम सप्ताह व संत संमेलन

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। रावेर तालुक्यातील रोझोदा येथे श्रीराम मंदीर व विठ्ठल मंदीर शताब्दीपूर्ती महोत्सव कार्यक्रमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात दि २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंम्बर दरम्यान संगीतमय रामायण कथा अखंड हरीनाम सप्ताहाचे अयोजन करण्यात आले असून यात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णुसहस्त्र नाम, दुपारी १२ ते ४ संगीतमय रामायण कथा सजीव देखाव्यासह, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ व रात्री ८ ते १० कीर्तन अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कथा वाचक म्हणून संगीत रामायणकार ह.भ.प. मंगेश महाराज वराडे (दाताळा) हे आपल्या रसाळ वाणीतून कथा सांगणार आहेत याच कार्यक्रमा दरम्यान दि ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजे दरम्यान भव्य संत संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज, कोषाध्यक्ष अखिल भारतीय संत समिती, हे उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाचे उदघाटक श्री अमृताश्रम स्वामी महाराज (बीड) हे असून , यावेळी संत गोपाल चैतन्यजी महाराज, वृंदावन आश्रम पाल, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, गादीपती खंडोबा देवस्थान फैजपूर, महंत सुरेशशास्त्री मानेकर बाबा, दत्त मंदीर सावदा, शास्त्री भक्तीकिशोरदासजी, कोठारी स्वामीनारायण मंदीर सावदा, महंत कृष्णगिरीजी महाराज, सोमवारगिरी मढी सावदा, ह.भ.प. दुर्गादास महाराज, खर्डी, महंत स्वरूपानंद महाराज दत्त मंदीर डोंगरदे,महंत भरतदासजी महाराज कुसुबा, नरेंद्रभाऊ नारखेडे, फैजपूर, ब्रम्हकुमारी वैशालीदीदी, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सावदा, भन्तेजी सुमन तिस्सा, महाथेरो बुद्ध विहार, भुसावळ आदी संत मंडळी उपस्थित राहणार असून, या सप्तहाची सांगता दि ४ डिसेंबर रोजी होणार असून यादिवशी कथा समाप्ती व दुपारी ४ ते ६ पर्यंत महाप्रसाद अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विस्वस्त मंडळ रझोदा यांनी केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!