तांदलवाडी येथे दि.२० डिसेंबर पासून संगितमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनीधी। तांदलवाडी ता.रावेर येथील दत्त मंदिर संस्थान येथे श्री चक्रधर स्वामी अवतरण अष्टशताब्दी वर्ष व दत्तात्रेय प्रभु अवतरण दिनानिमित्त दि. २० ते २७ डिसेंबर या कालावधित कविश्वर कुलभूषण भागवताचार्य चिरडेबाबा निफाड यांच्या मुखारविंदातून संगितमय श्रीमद् भागवत कथा निरोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ ते ९ श्रीमद् भगवत गीता पारायण, दुपारी २ ते ४ कथा प्रवचन, संध्याकाळी ५ ते ६ देवपूजा आरती,रात्री ८ ते ९ नामस्मरण अशी कार्यक्रमावली असून दि २० मंगळवारी सकाळी श्रीमद् भगवत गीता पारायण,दुपारी २ ते ४ कथा शुभारंभ, श्रीमद् भागवत कथा महात्म्य, दि. २१ बुधवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव, दि.२२ गुरूवारी असुर मर्दन,दि.२३ शुक्रवारी रुक्मीणी स्वयंवर विवाह, दि.२४ शनिवारी सुदामा भेट व श्रीकृष्ण तुला, दि.२५ रविवारी दिपपूजन, भगवतगीता निरोपण, दि.२६ सोमवारी कालधर्म निरोपण, निजधामा गमण,संध्याकाळी ५ वा. पालखी सोहळा,शोभायात्रा, दि.२७ मंगळवारी सकाळी ७ ते ८ श्रीमद् भगवत गीता पारायण,९ वाजता धर्म ध्वजारोहण दिपप्रज्वलन धर्मसभा,दहीहंडी,१२ वाजता उपहार विधी महाआरती तर दुपारी १२.३० ते २ महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानचे गादिपति श्री कृष्णराज बाबा पाचराऊत यांनी केले आहे.