रावेर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी तर्फे पक्ष बांधणी व बुथ रचनेला प्राधान्य- अतुल पाटील.
निंभोरा बु।,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रा.दिलीप एस सोनवणे। रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या विखुरलेल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन, बुथ रचना व प्रत्यक्ष भेटी घेत रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी जोरदार प्रयत्न रावेर राष्ट्रवादी लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील यांनी सुरू केले आहेत.
तालुक्यात गाववाईज सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचा दौरा करताना त्यात रसलपुर, बक्षीपुर,खिरोदा प्र.रावेर, के-हाळा, कर्जोद, अटवाडा,मोरगाव, खिरवड,दोधे, नेहेते, विवरा बूll, विवरा खुर्द या पद्धतीने दौरा करीत संबंधित गावांमध्ये जुन्या- नव्या राष्ट्रवादी प्रेमी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.या आधी कोचुर, रोझोदा, खिरोदा, सा, उटखेडा, कुंभारखेडा, आदी गावांनाही भेटी दिल्या.यावेळी सोबत राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील,माजी जीप सदस्य रमेश पाटील,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, बाजार समिती संचालक गणेश महाजन,जयेश कुयटे, माजी पं.स.समिती सदस्य योगेश पाटील उपस्थित होते.यावेळी तालुक्यात पक्ष बांधणी व संघटनकार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले.