स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “हर घर तिरंगा” उपक्रम, विशेष ग्रामसभेचे आयोजन
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज,विजय के अवसरमल ।। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत दिंनाक १३/८/२०२२ ते १५/८/२०२२ या कालावधीत गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या राष्ट्र ध्वाजाची उभारणी स्वय स्फुतीने करणे बाबत आवाहन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की आज दिनाक २९/७/२२ रोजी ऐनपुर ग्राम पंचायत मध्ये विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे अध्यक्ष सरपंच अमोल महाजन होते ग्राम सभे मध्ये ग्राम सेवक गोसावी अप्पा यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविणे बाबत तिरंगा फडकविण्याचे नियम सागितले. प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहिताचे पालन करावे. तिरंग फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावी . घरोघरी तिरंगा हा १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत फडकलेला असेल दररोज सायंकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयानि ध्वज संहिता पाळावी .
तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा . या उपक्रमातर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधी नंतर प्रत्येकांनी सन्मानाने व सुरक्षीत ठेवावे. अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये. तो सन्मानाने जतन करून ठेवावा यासाठी नागरिकांना सुचना द्याव्यात . अर्धा झुकलेला फाटलेला . कापलेला झेंडा कुठलेही परिस्थितीत लावला जावू नये .असा सुचना ग्रामसेवक यांनी केल्या.
तसेच हर घर जल > जल जिवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळ जोडणी दिली जात असुन ज्याकडे नळ जोडणी बाकी त्यानी आठ दिवसांचे आत ग्राम पंचायत मध्ये नोद करावी या ग्राम सभे मध्ये अनेक मुंद्यावर चर्चा करण्यात आली या सभेला ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते किशोर पाटील . राजेश पाटील . अनिल कोळी, सतिष अवसरमल . व गावातील नागरीक उपस्थित ज्ञानेश्वर महाजन, विलास अवसरमल,अतुल पाटील,पुथ्वीराज जेतकर, सुनिल खैरे, गोपाल पाटील, शरद अवसरमल, सुभम पाटील,गोलु महाजन सुनिल चव्हाण निलेश जेतकर,तुषार कचरे, मोहन कचरे, मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते तसेच सरपंच अमोल महाजन याच्या हस्ते तिरंगा झेंडयाचे वाटप करण्यात आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा उपक्रम मोठ्या उत्सवात करण्यात यावा असे आवाहन सरपंच अमोल महाजन यांनी केले