कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर झाडाझुडपात नवजात अर्भक आढळले
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथिल कर्जोत-अहिरवाडी रस्त्यावर स्त्री जातीचे अर्भक दुपारच्या सुमारास काटेरी झुडुपात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली असून या अर्भकाला रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात कोणीतरी टाकून दिल्याची शक्यता आहे.
रावेर कडून आहीरवाडीला जात असतांना एकाला रडण्याचा आवाज आल्याने स्त्री जातीच बालक असल्याचे उघड झाले आहे. याअर्भकास संदीप साळवे, भाजपचे पि.के.महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, अरुण शिंदे यांनी या बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.बाळाची प्रकृती चांगली आहे,७-८ दिवसांपूर्वी बाळ जन्मले असल्याचा अंदाज असून, जन्मदाती या बाळाला काटेरी झुडुपात सोडून गेले असावेत, अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असून यावर पुढील उपचार सुरु आहे.