भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

विद्युत साहित्यासह दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यां कडून निंभोरा पोलिसांनी केला जप्त

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील बलवाडी येथील शेत शिवारातील ज्ञानेश्वर महाजन यांच्या मालकीच्या गट नंबर २५९/१/२ मध्ये असलेल्या जलसिंचन पाणी योजनेच्या खोलीच्या समोर दि.२२-६-२२ रोजी ११ वा.३०मिनिटाच्या सुमारास पिवळ्या रंगाची एम एच१९ बी एम.३७४० ही पिवळ्या रंगाची ॲपे रिक्षा संशयित रित्या उभी होती.या बाबत पुरी गोलवाडा येथील शेतकरी ईश्वर तायडे, पो.पा.किरण पाटील,सुधीर पाटील यांनी चालकाची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिकच संशय बळावला असता.त्यांनी सखोल पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना चैन कप्पी व तुटलेला दोर दिसला तसेच चोरट्यांनी जी मोटर फोडली होती ती तब्बल साडे आठ क्विंटल वजनाची असल्यामुळे जो दोर आढळून आला होता तो दोर वारंवार तुटत असल्याने चोरट्यांचा डाव इथेच फसला. या बाबत शेतकऱ्यांनी सदरील घटनेची माहिती निंभोरा पोलिस स्टेशनचे स.पोनि.गणेश धुमाळ यांना दूरध्वनी द्वारे दिली असता त्वरित आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून परिसराची पाहणी केली.

या बाबत पुरी गावचे पोलिस पाटील यांनी फिर्याद दिल्याने संशयित आरोपी, निसार हारून पिंजारी, वय ३४ व आरिफ हारून पिंजारी वय ३७ दोन्ही रा. आमोदा.ता.यावल जि.जळगाव यांच्या ताब्यातून ६,००० रू.किमतीचे इलेक्ट्रिक मोटर ठेवण्यासाठी लोखंडी टेबल,३०,००० रू किमतीची तार कापलेली इलेक्ट्रिक मोटर,७,०००रू किमतीचा मोठा व्हॉल्व व ३ फूट लांबीचा पाइप,१२,००० रू किमतीचा त्रिकोणी आकाराचा लोखंडी चैन कप्पा, व ७०,०००रू,किमतीची पिवळ्या रंगाची ॲपे रिक्षा, ओप्पो कंपनीचा ९,०००रू किमतीचा फिक्कट निळसर रंगाचा मोबाईल हँडसेट, व ४,५०० रू किमतीचा एमआय कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल हँडसेट असा एकूण १,४४,५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून भाग ५ गुरनं ११६/२०२२ भादंवि कलम ३७९,५११,३४ या प्रमाणे निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स.पोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. ज्ञानेश्वर चौधरी हे करीत आहे.संशयित आरोपींना आज रावेर न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!