भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

निंभोरा पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन, रांची येथील हरवलेल्या महिलेची पुन्हा होणार कुटुंबीयांसोबत भेट.

खिर्डी,ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। रांची येथील जगन्नाथपुर पोलीस स्टे हद्दीतील बिरसा चौक प्रकाश नगर येथील रहिवाशी ५५ वर्षीय संपत देवी नामक वयोवृध्द महिला या ७ मार्च पासून बेपत्ता झाले होते त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु त्या कोठेही न मिळून आल्याने याबाबत त्यांचे पती धनंजय कुमार यांनी सदरील पोलीस स्टे ला त्यांची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती तसेच वृत्तपत्रात सुध्दा त्यांना शोधण्याचे आव्हान केले होते.

दि.१२-३-२३ निंभोरा पोलीस स्टे परिसरातील रेल्वे कवार्टर जवळ ५५ वर्षीय अनोळखी महिला फिरत असतांना आढळून आले असता त्या परिसरातील रहिवाशी संध्या मंगेश तायडे व शकुंतला नितीन तायडे यांनी सदरील महिलेस पोलीस स्टे येथे आणले असता निंभोरा पोलीस स्टे प्रभारी अधिकारी सपोनि गणेश धुमाळ, व पोलीस नाईक सुरेश अढायगे यांनी सदरील महिलेचे नाव गाव विचारले असता ती महिला घाबरलेली असल्याने कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.त्यामुळे सपोनि गणेश धुमाळ व सुरेश अढायगे यांनी माणुसकीचे भावनेतून चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव विकास सेवा तिर्थ चे व्यवस्थापक श्री.पाटील यांचेशी संपर्क साधून अनोळखी महीलेबाबत माहिती देवून मानव सेवा तिर्थ येथे दाखल करण्याची विनंती केली व त्वरित सरकारी वाहनाने सदरील महिलेस पोलीस नाईक सुरेश अढायगे व होमगार्ड यांनी वेले ता.चोपडा येथील मानव सेवा विकास सेवा तिर्थ येथे काल दाखल करण्यात आले.

सदर अनोळखी महीले बाबत माहिती मिळाली असता रांची झारखंड येथील रहिवाशी असून संपतदेवी धनंजय कुमार असे महिलेचे नाव आहे.सदर महिला ही आठ ते दहा दिवसांपासून हरवलेली असल्याने त्यांचे कुटुंबीय शोध घेत होते त्यांच्या परिवारातील सदस्यांसोबत बोलणे झाले असून लवकरच सदर महिलेस त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.तसेच निंभोरा पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीचे परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!