भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

कुठलीच भाषा कनिष्ठ नसते, भाषा संवाद साधण्याचे माध्यम आहे – उपजिल्हाधिकारी राहुल पाटील

ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,विजय के अवसरमल। ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात गुर्जर बोलीभाषा संवर्धन केंद्रामार्फत ‘गुर्जर बोलीभाषा साहित्य ‘ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक ‘सरदार ‘चे प्रकाशन डॉ विनोद पाटील, कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भागवत पाटील उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ डी आर पाटील, प्राचार्य,आर सी पटेल महाविद्यालय, शिरपूर, वसंत महाजन,चिनावल,डी के महाजन, वाघोदा, राजीव पाटील, रावेर, सौ मृणाल राहूल पाटील, जळगाव,सौ सुनिता विनोद पाटील, जळगाव, रामदास महाजन, उपाध्यक्ष ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीराम पाटील,संजय पाटील, एन व्ही पाटील इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी सुत्रसंचलन प्रा संजय महाजन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सतिश पाटील यांनी केले.

गुर्जर बोलीभाषा संवर्धन झाली पाहिजे हे काम २५ वर्षांपूर्वी झाले पाहिजे होते.ते आज होत आहे. बोलीभाषा संवाद साधण्याचे माध्यम आहे. कुठलीच भाषा कनिष्ठ वा श्रेष्ठ नसते. असे विचार राहूल पाटील यांनी मांडले. नियतकालिक महाविद्यालयाचा आरसा असतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नियतकालिक हे चांगले माध्यम आहे. तसेच गुर्जर बोलीभाषावर पीएचडी करण्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे असे मत डॉ विनोद पाटील, कुलसचिव यांनी मांडले.प्राचार्य डाॅ डी आर पाटील यांनी समाजातील अनिष्ट चालीरीतीं वर परखड विचार व्यक्त केले.

या वेळी वसंत महाजन, चिनावल,विलास पाटील चोपडा, सुलभा पाटील रावेर,रिटा चौधरी बालवाडी,शरद महाजन एरंडोल यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी केवळ एक कार्यक्रम घेऊन थांबणार नाही तर गुर्जर बोलीभाषा संवर्धन साठी सातत्याने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाला रावेर, मुक्ताईनगर, चोपडा तालुक्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, गुर्जर साहित्यिक, परिसरातील शिक्षण प्रेमी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.पुस्तक छापाईचे काम अर्थव प्रकाशन, जळगाव चे संचालक युवराज माळी व संगिता माळी यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!