भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

“राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज” यांचा विसर, ग्रामीण रुग्णालयाला महाराजांचे नाव न दिल्याने नगराध्यक्षासह नागरिक संतप्त

सावदा, ता.रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ रावेर तालुक्यातील सावदा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन ३० खाटांचे नविन आधुनिक अध्यावत कार्य प्रणाली कार्यन्वित झालेले प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे रविवारी दि. २५ संध्याकाळी ६ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे हस्ते होऊन रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.

स्थानिक व परिसरातील ३२ ग्राम खेड्याचा समावेश असल्याने रुग्णसेवेसाठी या रुग्णालया करीता सावदा नगरपालिकेची अंतर्गत असलेली जागा रुग्णालयास मोफत उपलब्ध करून दिली. देताना पालिकेने तत्कालीन वेळेस रुग्णालयाच्या इमारतीवर “छत्रपती शिवाजी महाराज” असलेले नाव हे जसे आहे त्याच प्रमाणे नामकरण करण्यात यावे अशी रास्त मागणी लेखी पत्रा द्वारे त्या वेळेस तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर सदर रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्याचा सन २००१ चा ठरावानुसार नाम करण करण्यात आले होते. तसेच होणाऱ्या नवीन रुग्णालयास हेच नाव देण्यात यावे अशी जिल्हा शल्य चिकिसक याचे कडे लेखी स्वरूपात वारं वार मागणीही केली असताना नाव का दिले नाहीत असा जाब माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी , राजेश वानखेडे यांचेसह नागरिकांनी विचारला. सदर रुग्णालय इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज नाव न देता सावदा ग्रामीण रुग्णालय असें नाव दिल्याने जो पर्यंत रुग्णालय इमारतीला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देणार नाही तो पर्यंत आंदोलन करू असा आक्रमक इशारां या वेळी देण्यात आला. जर दोन दिवसात नाम करण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला या बाबत खासदार रक्षा खडसे यांनी दुजोरा देत या बाबत लवकरच निर्णय घेण्याचे संबोधित करत आश्वासन दिले.

ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन प्रसंगी जिल्ह्या ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी किरण पाटील, खा. रक्षा खडसे ,भा. ज. पा. शहर अध्यक्ष जे. के.भारंबे ,आरोग्य अधिकारी योगेश राणे ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे व नगरसेवक सेविका,आरोग्य अधिकारी नीरजा पाटील, यांचे सह नागरिकांची उपस्थिती होती

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!