नवरात्रीच्या पहील्याच दिवशी तापी परिसरात देवीची आरती अंधारात
तासखेडा. ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील तापी परिसरातील गहुखेडा गावामध्ये बस स्टॅड जवळ काल संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास एका वावळीच्या झाडाची भली मोठी फांदी विज वाहीनी तांरावर पडली असता सपूर्ण परिसरा सह तासखेडा, रणगांव, रायपुर, व सुदगाव ही गावे अंधारमय झाल्याने दुर्गा देवी स्थापनेच्या पहिल्याच दिवसाची आरती अंधारात करावी लागली.
सुदैवाने यात कुठली जिवितहानी झाली नाही. मात्र नवरात्रीचा पहीला दिवस,माता दुर्गादेवी यांची स्थापना करण्यात आली आणि ऐन आरतीच्या वेळी विज प्रवाह खंडीत झाल्याने जगतजननी ची आरती ही अंधारातच करावी लागल्यामुळे अचानक पडलेल्या झाडाच्या फांदीच्या चर्चेबरोबर नाराजीचे सूर सुद्धा निघु लागले.
या घटनेची माहिती विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देताच ते घटनास्थळी दाखल होवून २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर विज पुरवठा पुर्ववत केला खरा. मात्र देविच्या पहील्याच दिवशी आरती ही अंधारात करावी लागल्याने सर्वत्र परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
२ तासा नंतर विज पुरवठा सुरळीत झाला मात्र काही तासातच पुन्हा रात्री ११ वाजेच्या सुमारास बत्ती गुल झाली असुन ती अह्याप पर्यत आली नसल्याने ऐन नवरात्रत्सवात होत असलेल्या विज पुरवठा खंडीत झाला.विद्युत मंडळाने विज पुरवठा पुन्हा सुरळीत करावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.