आषाढी एकादशी निमित्त सावदा येथे विठ्ठल मंदिरात भाविकांची मांदियाळी, पालखी सोहळा संपन्न
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सावदा येथे आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सकाळी येथील गांधी चौकातील विठ्ठल मंदीरात महापूजा व आरती झाली यावेळी भाविकांची मोठया संख्येने उपस्थिती होती, यावेळी येथे सुमारे दीड क्विंटल साबुदाणा चे व लाडू प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मंदीरात सुंदर सजावट करण्यात आली होती, दिवसभर नागरिकांनी मंदीरात दर्शन घेतले.
येथील चितोडे वाणी समाज मंदिरात देखील पांडुरंगाची महापूजा नितीन खरे व त्याच्या पत्नी अर्चना खरे यांचे हस्ते संपन्न झाली तर सायंकाळी शेकडो वर्षांची परंपरे प्रमाणे या मंदिरातून पालखी सोहळा देखील काढण्यात आला तर दिवसभर शहरात विविध ठिकाणी देखील धार्मिक कार्यक्रम सुरू होते.
नगरपालिका सावदा संचलित, श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व श्री ना गो पाटिल कनिष्ठ महाविद्यालय सावदा आणि श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळा सावदा. या दोन्ही शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक वेशभूषा करत आणि रस्त्याने भजन करत विठ्ठलाचे नाम संकीर्तन करत पूर्ण सावदा शहरामध्ये ग्राम प्रदक्षिणा केली. त्याचप्रमाणे विठ्ठल नामाचा गजर करत ठीक ठिकाणी लेझीम आणि पावली खेळत शहरवासी यांचे चित्त आकर्षित करून घेतले.याप्रसंगी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वारीमध्ये सम्मिलित होते.