भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा येथे भंडाऱ्या निमित्त डॉ. केतकी पाटील यांचे हस्ते म्हाळसादेवीची महाआरती

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। गेल्या १३ वर्षांपासून रावेर तालुक्यातील सावदा येथे पुरातन धनगर वाडा म्हणून ओळ्खल्या जणाऱ्या म्हाळसादेवी मंदिरात मिरचीचा ठेचा व कळण्याची भाकरीचा भंडारा होत आहे. आजही सालाबाद प्रमाणे मिरचीचा ठेचा व कळण्याची भाकरीचा भंडारा पार पडला.

सावदा येथे २०० वर्षांपूर्वी पासून पुरातन असलेल्या धनगर वाड्यात कालभैरव, म्हाळसादेवी, खंडेराव मंदीर आहे. २०१२ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला.

नवरात्रौत्सवानिमीत्त म्हाळसा देवीची गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी म्हाळसादेवीची महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाची सुरुवात झाली. यावर्षी ६ क्विंटल कळण्याची भाकरी व ४ क्विंटल ठेच्याचा महाप्रसाद होता.भंडार्‍यामध्ये सावदा व परीसरातील गावातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यशस्वीतेसाठी म्हाळसादेवी मित्र मंडळ, माताराणी दुर्गाउत्सव मंडळ व जगमाता मित्र मंडळ,अमरज्योत मित्र मंडळ व परिसरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!