भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ऐनपुर येथे बारा गाड्या खाली एकाचा मृत्यू, आठ ते दहा जण जखमी

ऐनपुर ,ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज. विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट येथे बारागाड्या ओढण्यात आल्या परंतु यात बारगाड्याचा ताबा सुटल्याने दिनकर रामकृष्ण कोळी यांचा मृत्यू झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ऐनपूर येथे बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे
बारागाड्या हे ओढण्यात येत असतात,परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती.अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढण्यात येतात,अक्षयतृतीया निमित्त दि.२३ एप्रिल रोजी ऐनपुर येथील बारिघाट येथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी,सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल,सुभाष भील,ईश्वर भील,नामदेव भील,किशोर हरी ,मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमधे सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे जखमी झाले.
दिनकर रामकृष्ण कोळी वय ६० वर्ष यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले असता त्यांना मयत घोषित केले. तर बाकी जखमीवर उपचार सुरू आहे. त्यावेळी भगत म्हणून सोपान भील तर बगले म्हणून सुनील महाजन आणि सचिन महाजन हे सहायक होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!