सावखेडा सह चिनावल,खिरोदा परिसरात खुलेआम सट्टा-मटका
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावखेडा परिसरात मोठया प्रमाणावर सट्ट्या- मटक्याचे मोठे जाळे पसरले असून सट्टा-मटक्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असुन जनतेला लुटण्याचे काम सुरू आहे यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
अधिक वृत्त असे की, रावेर तालुक्यातील सावखेडा येथे सट्ट्याची पिढी असून येथील परिसरात सट्ट्याच्या धंद्याने जोर धरला आहे, परिसरातील सावखेडा बु,सावखेडा खु. सह खिरोदा, कळमोदा, रोझोदा, चिनावल, जानोरी, चिचाटी, लोहारा, कुंभारखेडा, गौरखेडा,सह आदी गावांमध्ये या पेढी मार्फत एजंट कडून सट्ट्या-मटक्याच्या बीटा घेतल्या जातात. हा परिसर ग्रामीण भाग असून या भागात मजूर शेतकरी वर्ग,व हातावर कमावून पोट भरणारी लोक रहात असतात. हे लोक दररोज हजारो रुपये यात हारत असतात. त्या मुळे सट्ट्या- मटक्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.त्या मुळे सट्टा-मटका कायम स्वरूपी बंद व्हावा अशी मागणी केली जात आहे.