खिर्डी परिसरात सर्रासपणे खुलेआम गुटखा विक्री
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी गावासह परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. यात काही किरकोळ गुटखा विक्रेते आज घडीला होलसेलर बनले असून,रावेर तालुक्यातील खेड्या-पाड्यात जावून घरपोच गुटखा पुरवण्याच काम अगदी जोमात सुरू आहे.
या सर्व प्रकाराकडे अन्न व औषधी विभागासह इतर संबंधित विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राज्य सरकारने गुटखा विक्री वर बंदी आणली असली तरी मात्र ही बंदी कागदावरच असल्याच दिसून येत आहे. अवैध गुटखा व्यवसाय रावेर तालुक्यात जोरात सुरू आहे.कोणाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरु आहे.जिल्ह्यातील अनेक भागात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत आहे, खिर्डीमध्ये मात्र कारवाई होतांना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.