भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश .भुसावल येथे बदली संशयास्पद..?

Monday To Monday NewsNetwork।

रावेर (प्रतिनिधी)।रावेर पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश . तालुक्याचे पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या बाबत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तथा अनियमित कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे बाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.10मे2021रोजी उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना आदेश काढून चौकशी करून तात्काळ कारवाई करणे बाबत आदेश काढले आहेत.
लोकसंघर्ष मोर्चा जळगाव अध्यक्षा श्रीमती प्रतिभाताई शिंदे यांनी दि.7/5/2021रोजी दिलेला तक्रार अर्ज.अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे सलग्न रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांचेकडील निवेदन.रावेर येथील मेनरोड वरील गहुखाना येथील महेशचंद्र नामदेव लोखंडे,दि.9मे 2021रोजी खासदार श्रीमती रक्षा खडसे यांचेकडील पत्र इत्यादी संदर्भांन्वये रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्याबाबत भ्रष्टाचाराच्या तथा अनियमित कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे बाबत तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार रावेर तालुक्यातील रेशन व्यवस्थेअंतर्गत अनियमितता व आदिवासींना रेशन कार्ड मिळण्याबाबत होणारा विलंबाबाबत जबाबदार पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या असून अद्याप पर्यंत त्या तक्रारीची दखल घेऊन त्यात सुधारणा झालेल्या नाहीत तसेच पेसा क्षेत्रातील आदिवासी व इतरत्र राहणाऱ्या गोरगरिबांवर रेशन व्यवस्थेत होणाऱ्या दंगलीमुळे अन्याय होत असल्याबाबत निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे सलग्न रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार व संघटना यांच्याकडील तक्रारीत नमूद केल्यानुसार प्रति रेशन कार्ड तीन रुपये प्रमाणे महिन्याला दीड लाखाची वसुली करणे,रेशनकार्ड शोध मोहीमच्या फॉर्म मध्ये बदल करून पैसे गैर पद्धतीने विक्री करून वसूल करणे,शासकीय मका खरेदी मध्ये वजनाची हेल्पर करून आर्थिक घोटाळा करणे,दुकानदारांना लागणारे सर्व छापील साहित्य स्वतःप्रिंटिंग करून जबरदस्ती विकत घ्यायला लावणे.अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दुकानदार व रेशन कार्ड धारक यांच्याकडून प्राप्त झालेल्या आहेत.तसेच महेशचंद्र नामदेव लोखंडे रा.गहुखाना मेनरोड रावेर,रावेर तालुक्यातील केर्‍हाळे बु.येथील स्वस्त धान्य दुकानदार डिगंबर रामचंद्र बावस्‍कर यांचे विरुद्ध रावेर न्यायालयात बनावट रेशनकार्ड प्रकरणी फिर्याद दिल्यावरून मा. न्यायालयाने सदर प्रकरणी फौ.प्र.सं.156(3) प्रमाणे गुन्हा दाखल होऊन आरोपी दिगंबर बावस्कर यास पोलिसांनी अटक केली होती व सदर आरोपीस मा. न्यायालयाने पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश केले सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा केल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव यांनी रावेर पुरवठा कार्यालयाकडून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश केले असता रावेर पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांनी त्याबाबतचा खोटा अहवाल सादर केल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई होणेबाबत नमूद केले आहे. पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांनी तालुक्यातील रेशन कार्ड संख्येनुसार सुमारे 75 हजार अर्ज खाजगीरित्या छापले व तीन रुपये अर्जा प्रमाणे त्याची रेशन दुकानदारांना विक्री केल्याची माहिती एका दुकानदाराने दिलेली आहे .
उपरोक्त तक्रारीची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा जेणेकरून पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.असे प्रांताधिकारी फैजपूर यांना दिलेल्या आदेशात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे.

पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची भुसावल येथे बदली संशयास्पद .कारवाईतुन वाचवण्याचा खुद्दशासन स्तरावरून प्रयत्न ? रावेर येथील पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या खातेनिहाय चौकशी कामी भुसावळ येथील पुरवठा निरीक्षक पदावर हर्षल पाटील यांची बदली केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.हर्षल पाटील यांची पुन्हा त्याच पदावर बदली झाल्याने भुसावळ येथील पुरवठा निरीक्षक पदासाठी जिल्ह्यात,महसूल विभागात दुसरा कोणी पात्र/लायक अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता का?हर्षल पाटील यांना पुन्हा पुरवठा निरीक्षक पद दिले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांना कायदेशीर कारवाईतुन वाचवण्याचा प्रयत्न खुद्दशासन स्तरावरून सुरू असल्याचे बोलले जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!