खिर्डी येथे शिवजन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। खिर्डी खु येथे आज छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती तर्फे दुर्गामाता मंदिर परिसरात शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन केले .
तसेच “रक्तदान हेच जीवनदान” “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते , जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीमध्ये काही प्रमाणात रक्तपेढी मध्ये रक्तसाठा कमी पडू लागला आहे.या करिता युवकांमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवणे व त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती, व तत्पर फाऊंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांच्या वतीने जळगांव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढी च्या सहकार्याने आज सकाळी ९ ते १ वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रसंगी खिर्डी खु चे उपसरपंच पुष्पा ताई पाटील, सदस्य जयश्री कोचुरे,अनिल लढे, पत्रकार चंद्रकांत कोळी, डॉ. बसेर सर, डॉ.सौ.जागृती लोहार, योगेश पाठक, गिरीश खोंडे, उदय सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ,नवयुवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.